आपल खान्देशमराठवाडामहाराष्ट्र

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा, अन्यथा… ; राज्य सरकारला या तरुणाचे पत्र..

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संभाजीनगर विभागीय आयुक्तांना एक निवेदन मिळाले आहे. धनराज गुट्टे या व्यक्तीने हे निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. या निवेदनात जरांगे हे चुकीच्या मागण्या करीत आहेत आणि जातीय ते निर्माण करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.

  • आत्मदहन करण्याचा इशारा…

धनराज गुट्टे यांनी निवेदनात जर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने एक पत्र मुंबई सचिवालय कार्यालयाला पाठवले आहे.

  • पोलीस आयुक्तांनी पाठवलेले पत्र..

या प्रकरणावर छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये जरांगे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे