ब्रेकिंग

लोहारा येथील डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

लोहारा (झूम मराठी) शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी दारा संचलित डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक बी एन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिना विषयी सविस्तर माहिती दिली त्यानंतर विद्यालयातील उपशिक्षक आर के सुरवाडे सर व आर जी बैरागी सर तसेच बी एन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली मानवी जीवनातील महत्त्व सुद्धा सांगितले याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली त्याचबरोबर शिक्षक सुद्धा या योगासाठी उपस्थित होते शिक्षकांनी सुद्धा योगासने केली यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे सर पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे