आपल खान्देशब्रेकिंग

रात्रीची ड्युटी करुन घरी जात असताना, पोलीस कॉनस्टेबल अपघात मृत्यू!

धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी (दि.27) अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलातून शोक व्यक्त होत आहे.

पोलीस कॉन्स्टेबल गुलाब गोविंदा शिंपी (36) हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास आहेत. ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने दररोज दुचाकीने आनंदखेडे ते साक्री अपडाऊन करायचे. काल रात्रीची ड्युटी असल्याने ते आज सकाळी कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते. मात्र, आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रक (जीजे 12/7447) ला मागाहून धडक दिली.

या अपघातात पो कॉ. गुलाब शिंपी हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती आनंदखेडे गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर मित्रपरिवारासह आप्तस्वकीयांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात दुपारी उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. पोकॉ. गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 5 वर्षांची मुलगी ,3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने पोलीस दलासह आनंदखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे