महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रातील 13 जागांवर ‘शिंदे वि. ठाकरे’ लढत…



महाराष्ट्रातील अशा 13 जागा आहे, जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे किमान या जागांवर तरी शिवसैनिक कुणाच्या पाठीमागे आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातील जागा तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी बालेकिल्लेसदृश आहेत. त्यामुळे इथल्या जागांकडे तर सगळ्यांचं लक्ष आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर जागांवरही, जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार आहे, तिथेही चुरशीचा सामना रंगलेला दिसून येतोय.

महाराष्ट्रातील ‘शिंदे विरुद्ध ठाकरे’ लढतीची सविस्तर यादी पाहूया.

  • उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)
  • दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
  • दक्षिण मुंबई – यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)
  • बुलडाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)
  • यवतमाळ – वाशिम राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)
  • हिंगोली – बाबूराव कदम (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)
  • छ संभाजी नगर – संदिपान भुमरे (शिवसेना) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)
  • नाशिक – हेमंत गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)
  • शिर्डी – सदााशिव लोखंडे (शिवसेना) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)
  •  मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)
  • कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)
  • ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)
  •  हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)

कधीकाळी एकाच पक्षात, शिवसेनेत काम करणारे नेते आता एकमेकांविरुद्ध उभी ठाकली आहेत. तळागाळातला शिवसैनिक कुणाच्या बाजूनं उभा राहतो, हे 4 जून 2024 रोजीच्या निकालातून स्पष्ट होईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे