आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मारामारी करणारे शिक्षक सहित मुख्यद्यापक निलंबीत!

कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नाशिक येथील शाळेत हाणामारी करणाऱ्या दिंडोरीतील दोन शिक्षकांसह शाळा बंद ठेवणाऱ्या वाडीव येथील मुख्याध्यापिकेस निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ येथे १३ मार्च २०२४ रोजी आयोजित मुख्याध्यापकांच्या बैठकीत शाळेचे शिक्षक प्रवीण देशमुख (दळवी) व भवानीनगर शाळेतील शिक्षक धनंजय क्षत्रिय या दोघांमध्ये हाणामारी झाली होती. दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी गंभीर दखल घेत शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सुपुर्द केला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने या दोघा शिक्षकांना निलंबित केले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मार्च महिन्यात वाडीव-हे शाळेला भेट दिली होती. त्यावेळी शाळेला कुलुप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती शाळेच्या मुख्याध्यापिकेने परस्पर निर्णय घेत वेळेआधीच शाळा बंद केली होती. याबाबत मित्तल यांनी शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकासही निलंबित करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे