तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात, पिंपळगाव बांबरुडच्या शाळेतील विध्यार्थीनीचे शेतीविषयक मॉडेल भडगाव तालुक्यातून प्रथम..
आधुनिक काळानुरूप पर्यावरण पुरक शाश्वत शेती आधारित प्रतिकृती यावेळी मांडण्यात आली होती, या शेती आधारित मॉडेल मुळे पांरपारीक शेतीच्या सहा पट जास्तीचा नफा शेतकऱ्यांना मिळेल..
- भडगाव – झूम मराठी ऑनलाईन
भडगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लहान गटातुन पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी काजल रविंद्र पाटील हिने सादर केलेल्या प्रदर्शनात आधुनिक काळानुरूप पर्यावरण पुरक शाश्वत शेती विषयक अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
बदलत्या शिक्षण पद्धतीचा विचार करून विद्यार्थ्यांचा व शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी शासन सतत प्रयत्न करत असते, भडगाव तालुक्यातील कै. यादव दगडु पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी येथे तालुकास्तरीय एक दिवसीय प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता, त्यात लहान गटातील पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवीची विद्यार्थीनी काजल रविंद्र पाटील आधुनिक काळानुरूप पर्यावरण पुरक शाश्वत शेती आधारित प्रतिकृती यावेळी मांडण्यात आली होती, या शेती आधारित प्रतिकृती (मॉडेल) मुळे पांरपारीक शेतीच्या सहा पट जास्तीचा नफा शेतकऱ्यांना मिळेल, व कमी पाणी लागेल, कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेता येईल, भाजीपालाचे लागवड सहज करता येणार व खातांचा पाहिजे तसा वापर करता येणारा आधुनिक काळानुरूप पर्यावरण पुरक शाश्वत शेती विषयक प्रतिकृतीने भडगाव तालुक्यातून प्रथम क्रमांकासाठ निवड करण्यात आली, काजल पाटील हिस विद्यालयाचे विज्ञान शिक्षक प्रदीप वर्हाडे, राजेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे तालुकास्थरीय एक दिवसीय प्रदर्शनात गट शिक्षणाधिकारी गणेश पाटील, केंद्र प्रमुख राजेश चव्हाण व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनात लहान गटातुन पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील विद्यार्थीनी कु. काजल रविंद्र पाटील हिचा गौरव करण्यात आला.




