आपल खान्देशगुन्हेगारी

जुना वाद आणि धक्काबुक्की, शिवीगाळ करून एका शेतकऱ्याला भरला दम ..

पाचोरा तालुक्यातील पिपंळगाव हरेश्वर येथील शेतकरी असलम खां सुभेखौँ पठाण यांना जुन्या पोलीस केसच्या वादाचा राग धरून संशयित आरोपी यांनी अस्लम पठाण यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून दम भरला कि मागील केस मागे घ्या अन्यथा तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू असे धमकावले अश्या प्रकारची तक्रार नोद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील पिपंळगाव हरेश्वर येथील शेतकरी असलम खां सुभेखौँ पठाण (वय 41)  आपल्या घरासमोरील सार्वजनिक जागेत लावलेली चारचाकी वाहन काढत असतांना जुन्या वादाचा राग असलेले संशयित आरोपी बलदार खाँ बाबे खाँ पठाण, शकिला बी बलदार खॉ पठाण, अल्फियों आमिन शेख यांनी अस्लम पठाण यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व तुम्ही मागील केस मागे घ्या नाही तर आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन तुम्हाला फसवु अशी धमकी वजा दम दिला असे व्हिडीओ क्लिप व साक्षीदार सह पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारदाराने तक्रार नोंद केली आहे.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे