Nashik | शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळी मतदान केलं. त्यांनी आज सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी ईव्हीएम मशिनला हार घातला होता. आता या प्रकरणात शांतिगिरी महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शांतिगिरी महाराजांवर ईव्हीएम मशिनला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईव्हीएम मशिनला हार घालून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रंबकेश्वर पोलिसांकडून शांतिगिरी महाराज यांच्यावर निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला आपल्या गळ्यातला हार घातला. नाशिक लोकसभेच्या रिंगणात स्वामी शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केलं. त्यावेळी ईव्हीएम मशीनला शांतिगिरी महाराजांनी हार घातला. ईव्हीएम मशीनला हार घातला म्हणून शांतिगिरी महाराजांवर आता गुन्हा दाखल झाला आहे.



