उद्या लागणार बारावीचा निकाल, असा पाहा तुमचा निकाल…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल.
विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उद्या म्हणजे 21 मेला आपला निकाल पाहू शकणार आहेत.दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- hsc.mahresults.org.in
- hscresult.mkcl.org
- results.gov.in.
वरील साईटवर जाऊन विद्यार्थी हे आपला बारावीचा निकाल आरामात पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. यंदाच्या निकालाच कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.



