आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

इंडिया आघाडीत कुणीही पंतप्रधान पदाचे नेतृत्व करण्यासारखे नाही- देवेन्द्र फडणवीस

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) जळगाव लोकसभेचे महायुतीचे उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचोऱ्यात सभा घेत इंडिया आघाडी विरोधात टीका करत इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण केला यावेळी सभेला नागरिकांनी गर्दी केली होती विजय संकल्प सभा आज पाचोऱ्यात पार पडली.

आज पाचोऱ्यात भडगाव रोडवरील कैलामाता मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव लोकसभेचे महायुतीचे उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या प्रचारसभा दरम्यान देवेंद्र फडणवीस इंडिया आघाडीवर बरसले, इंडिया आघाडीत कुणीही पंतप्रधान पदाचे नेतृत्व करण्यासारखे नाही, आघाडीच्या इंजिन ट्रेन मध्ये इंजिन चालवायला कोणीच चालक नाही तेथेच फक्त सोनिया राहुलगांधी व प्रियांका गांधी यांना जागा आहे मात्र  इंडिया आघाडीचा प्रत्येक जण स्वतःला पंतप्रधान पदाचे दावेदार समजतात त्यांच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. या उलट महायुतीच्या बुलेट ट्रेनच्या इंजिनमध्ये मध्ये सक्षम चालक म्हणून नरेंद्र मोदी हेच आहेत पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, येत्या काही दिवसात उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, खान्देश व जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती देतानाच समाजातील सर्वच स्तरातील घटकांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटिबद्ध असल्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती यांचे मने जिंकली.

 उन्नती नितीन पाटील हिने स्वत:च्या हाताने रेखाटलेले देवेंद्र फडणवीस यांचे चित्र पाचोऱ्याच्या सभेत भेट दिले.

उत्साहात पार पडलेल्या सदर सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार सुरेशमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार अे.टी.नाना पाटील, माजी खासदार डॉ विकास महात्मे, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, मधुकर काटे, अनिल वाघ, डॉ नीलकंठ पाटील, सुनील पाटील, जयप्रकाशजी बाविस्कर यांच्यासह महायुतीचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे