माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांची पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावास भेट.
पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे धनगर समाजाचे नेते, आणि धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दिली भेट.
डॉ महात्मे हे आज पाचोरा येथे आले असता समीतीचे प्रदेश सचिव श्री. ज्ञानेश्वर परदेशी आणि आखतवाडे येथील माजी सरपंच संजय परदेशी यांनी डॉ महात्मे यांना आखतवाडे आणि परीसरातील धनगर बहुल गावांना भेट देण्याची विनंती केल्याने डॉ महात्मे यांनी आखतवाडे सह बदरखे, मोहळाई या गावंना भेट भेट देऊन समाज बांधवासह उपस्थित ग्रमंस्थाशी संवाद साधला.
यावेळी डॉ महात्मे यांनी आखतवाडे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला भेट देऊन तेथील परीक्षार्थींना मार्गदर्शन करुन त्यांच्याशी स्पर्धा परिविषयी चर्चा केेली.तर सदर अभ्यासिकेला सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ महात्मे यांनी सांगितले.
यावेळी डॉ महात्मे यांच्या सोबत धुळे पंचायत समितीचे मा. सभापती प्रा. विजय पाटील, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव मा.ज्ञानेश्वर परदेशी, ऊत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील सुनिल परदेशी,यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभ्यासिकेच्या वतीने सरपंच कुमारी कल्पना पंडितराव परदेशी, मा.सरपंच संजय परदेशी यांच्यासह ग्रामस्थाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



