आपल खान्देशब्रेकिंगसखी

कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारच्या अपघातात, अखेर मुख्याध्यापिकाचा उपचारादरम्यान मृत्यू..!

भडगाव तालुक्यातील वडजी गावाजवळ भीषण अपघात जखमी झालेल्या खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता सतीश साळुंखे (वय ४८, रा. इंद्रप्रस्थ नगर, दूध फेडरेशन रोड) यांचा रविवार दि. ५ मे रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मयत झालेल्या ललिता साळुंखे यांचे पती सतीश साळुंखे हे वर्षभरापूर्वी खुबचंद सागरमल याच शाळेतून सेवानिवृत्त झाले. तर मुलगा बंगळुरू व मुलगी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ललिता साळुंखे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दि. १ मे रोजी मुलगी संजना हिच्यासह भडगाव येथे कारने जात होते. त्या वेळी वडजी गावाजवळ रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन ते चार वेळा उलटली आणि झाडावर जाऊन धडकली.

या अपघातात ललिता साळुंखे या जबर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर मुलगी संजना ही किरकोळ जखमी झाली. चार दिवस ललिता यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रविवार दि. ५ मे रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. शिक्षण क्षेत्रातील मंडळींना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे