आपल खान्देशराजकीयसखी
महायुतीचे लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगावकरांसाठी मांडले विकासाचे मत
जळगाव शहरातील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट येथे आयोजित व्हिजन विकासाचा या कार्यक्रमाला स्मिता वाघ उपस्थित राहिले. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांचे माझे व्हिजन हे पूर्णपणे ठरलेले असून आता ते फक्त सत्यात उतरवायचे राहिले आहे आणि त्याकरिता मी उत्सुक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यासाठी आमच्या विरोधकांचे देखील व्हिजन ऐकून घेण्याची उत्सुकता होती पण त्यांना कदाचित अजूनही वेगळ्या गोष्टींची चिंता आहे असं दिसतयं. असं म्हणत आपले मत व्यक्त केले, यादरम्यान उपस्थित बांधव व भगिनिंसोबत चर्चा करत जळगावला पुढील पाच वर्षात विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्याचा संकल्प मी गाठीशी बांधलाय.



