आपल खान्देशब्रेकिंग

Road Accident | एका विचित्र अपघातात पाचोरा येथील तरुणाचा मृत्यू..!

जळगाव (झूम मराठी वृत्तसेवा) एरंडोल जवळील म्हसावद मार्गावर श्री कृपा जिनिंग जवळ इर्टिगा, ट्रक एपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाचोरा येथील दुचाकीस्वार राम कृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला असून हीदुर्दैवी दुर्घटना रविवारदुपार च्या सुमारास घडली.

या घटनेबाबत एरंडोल पोलीस याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक हा एरंडोल कडून म्हसावदकडे जात असताना ट्रकला (एमएच, डीक्यू 8174) क्रमांकाची दुचाकी मोटर सायकलने ट्रकला ओव्हरटेक केले. म्हसवादकडून एरंडोलकडे दुचाकी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या (एमएच १९ व्ही १२६७) क्रमांकाच्या अॅपे रिक्षा (एम एच 18 बीसी 1408) आल्याने समोरासमोर वाहनांची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (ठाकरे नगर -पाचोरा) हा युवक जागीच गतप्राण झाला. मयत तरुण हा कुटुंबातील एकुलता एक असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

अपघातात मयत झालेले रामकृष्ण पाटील हा एकुलता एक मुलगा होता तो एका कंपनीत मुलाखत देऊन परत येत होते आणि काळाने घाला घालत मृत्यू आल्याने परिसरात शोक कळा पसरली आहे.

यावेळी गणेश पाटील (रा. खेडी), राजू भावसार (रा. एरंडोल), विठ्ठल वंजारी (रा. एरंडोल) तसेच उमरजे येथील काही ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदत कार्यासाठी सरसावले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी यांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ दाखल झाले.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे