महाराष्ट्रराजकीयसखी

MNS | मनसेने शालिनी ठाकरेंना तोंडावर पडले!

इकडून तिकडून पाला पाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असं कडाडणाऱ्या मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांना मनसेने अक्षरश: तोंडावर पाडलंय. ही मनसेची अधिकृत भूमिका नाही, असं पक्षाने प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केलंय. मनसेला ‘धनुष्य बाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे, अशी टीका शालिनी ठाकरे यांनी सत्ताधारी आघाडीवर विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली होती.

लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असं शालिनी ठाकरेंनी समाजमाध्यमातील पोस्टमध्ये म्हटलं होतं.

पण मनसेने आज एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ते शालिनी ठाकरेंचं वैयक्तिक मत असल्याचं त्यांचा उल्लेख न करता म्हटलंय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यानी, महायुतीच्या या उमेदवाराला आमचा पाठींबा नाही, त्या उमेदवाराबद्दल आमची नाराजी आहे, अशी विधाने केली. ही विधाने पूर्णतः अप्रस्तुत आहेत, ती त्यांची व्यक्तिगत मते आहेत, त्यामुळे माध्यमांनी पण ही भूमिका पक्षाची भूमिका म्हणून बघू नये, असं मनसे नेते शिरीष सावंत यांनी स्पष्ट केलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर पक्षातील नेते आणि नियुक्त प्रवक्ते यांच्याशीच संवाद साधावा, असं माध्यमांना आवाहन करतानाच, सर्व पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर नोंद घ्यावी, असं प्रसिद्धीपत्रकात बजावण्यात आलंय.

तशीही राज ठाकरेंनी मनसेची अधिकृत भूमिका जाहिर केल्यानंतरही मनसैनिक त्या भुमिकेसोबत नसल्याचं जमीनीवरचं चित्र आहे. मनसैनिकांची खाजगीतली भूमिका मोदीभाजपाविरोधातली आहे. शालिनी ठाकरेंचं वक्तव्य याच भुमिकेचं प्रतिनिधित्व करणारी होती. आता पक्षाने स्पष्टीकरण दिल्यावर शालिनी ठाकरे काय आणि कशी प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे