आपल खान्देश
पाचोऱ्यातील शकील शेख सह, जळगाव जिल्ह्यातील ११पोलिसांना पोलिस महासंचालक पदक जाहिर..
पोलिस विभागात काम करीत असताना उत्तम कामगिरी केल्याबद्दल गृहविभागाच्या पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांनी राज्यातील पोलीस अधीक्षक व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना समावेश असून विशेष बाब म्हणजे पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शकिल अहमद शब्बीर शेख यांचा समावेश आहे
राज्य शासनाच्या गृह विभागाने या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलिस दलातील संजय नारायण हिवरकर, मीनल श्रीकांत साकळीकर, राजेश पंडित पाटील, दीपक देवराम चौधरी, विजय नामदेव सोनवणे, प्रवीण गजानन जाधव, महेश अरविंद बागुल, मोहम्मदअली सत्तारअली सैयद, शकिल अहमद शब्बीर शेख, संजय राजाराम पाटील, राजेश शाहू पाटील यांचा समावेश आहे.



