आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

होय, मी भाजपमध्ये जातोय’; एकनाथ खडसे यांची शरद पवारांना सोडचिट्ठी…

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे...

एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, शरद पवारांनी मला जर राष्ट्रवादीत पक्षात घेतले नसते तर माझे राजकीय करिअर पूर्णपणे संपले असते, पण आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे हे पु्न्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

एकनाथ खडसे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु त्यावेळी भाजपने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे खडसे नाराज झाले होते. त्यानंतर खडसे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष सुरु झाला.

 भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्ती जास्त जागा जिंकण्यासाठी मागील काही महिन्यांपासून अनेक नेत्यांना सोबत घेतलं आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क असलेल्या एकनाथ खडसे यांना सोबत घेतल्यास जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल, त्यादृष्टीनेच खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे