आपल खान्देशब्रेकिंग

बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकांने विषारी द्रव्य पिवून संपवले जीवन…

पाचोरा तालुक्यातील कजगाव येथील 26 वर्षीय युवकाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली मृतक युवकाचे नाव वैभव अशोक परदेशी आहे. जळगाव जिल्हातील कजगाव येथील वैभव परदेशी या युवकाचा धुळे जिल्ह्यातील एका मुलीबरोबर 23 एप्रिल रोजी विवाह ठरला होता. विवाहाच्या निमंत्रण पत्रिकाही नातेवाइकांना वितरित करण्यात आल्या होत्या. अशातच युवक वैभवने विषारी द्रव्य पिवून आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कजगाव मध्ये घरात लग्नाची लगबघ सुरु होती घरात आनंदाचे वातावरण सुरु असताना आज सकाळी घरात ज्याचे लग्न आहे तो नवरदेव युवक वैभव उठला नव्हता  त्याला उठविण्यासाठी आई गेली असता तो काही प्रतिसाद देत नव्हता आईला धक्काच बसला त्याला दवाखान्यात घेऊन गेले असता त्याला मृत घोषित करण्यात आल्याने तेथेच नातेवाईकांनी हंभभरडा फोडला. वैभव हा मनमिळाऊ स्वभावाचा होता मेहनती तसेच समाज कार्यात सर्वांच्या नेहमी पुढे असायचा त्याच्या आकस्मित मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्याने असे पाऊल उचलण्या पूर्वी कुटूंबाचा विचार करायला हवा होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे