आपल खान्देशब्रेकिंग

मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता- अमोल शिंदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजप खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच त्यांच्यासोबत भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे हे देखील ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर अमोल शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.


भाजप नेते अमोल शिंदे यांनी ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चावर सांगितले की, मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून माझे नेते संकटमोचक, आदरणीय गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठपणे पक्ष वाढीसाठी माझे काम असेच सुरू राहील. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असल्या अफवांकडे मुळीच लक्ष देऊ नये, असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे