ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

भाजपचे खासदार उन्मेष पाटील जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार?

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलण्यात आलं. त्याठिकाणी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील नाराज झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच आज उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीत अनेक जण नाराज असल्याचे दिसून येत आहे. यातच जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने त्यांची पक्षांतर्गत नाराजी दिसून आली. आज पाटील यांनी राऊतांची भेट घेतली. मात्र संजय राऊत आणि मी संसदेत एकत्रित काम केलं आहे. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. येत्या काही दिवसात यावर सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर जळगावात भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहेत. उन्मेष पाटील यांनी राऊतांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यातच उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे गटात दाखल होतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे आला आहे. ठाकरे गटाकडून याठिकाणी अद्याप कोणताही उमेदवार ठरलेला नाहीय. त्यामुळे ठाकरे गटाकडून जर उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली तर भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना मोठा फटका बसू शकतो. कारण गेल्या पाच वर्षात उन्मेष पाटील यांनी कार्यकर्त्यांचं मोठं जाळं उभं केलं आहे. यासह त्यांना महाविकास आघाडीची ताकद असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत जळगावचं चित्र बदलण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे