आपल खान्देश
भडगाव तालुक्यातील एकमेव अशी गिरड वि का सहकारी सोसायटीच्या कर्जाची 100% कर्ज वसुली..
भडगाव तालुक्यातील गिरड वि का सहकारी सोसायटीची बँक कर्जाची 2023 ते 24 या आर्थिक वर्षात 100% टक्के कर्ज वसुली झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत असून, बँक संचालक मंडळ व कर्मचारी तसेच सोसायटीच्या सर्व सभासदांचे तालुक्यातून कौतुक होतांना दिसत आहे.
भडगाव तालुक्यातील गिरड येथील वि. सोसायटीचे चेअरमन श्रीमती हिराबाई धनराज पाटील व संचालक मंडळ व तसेच, सचिव प्रशांत पाटील, सुरेश पाटील, आत्माराम मनोरे, जे डी सी सी बँक मॅनेजर रावसाहेब बोरसे व जितेंद्र सोनवणे, यांच्या सर्वांच्या सहकार्याने कर्जाची 2023 ते 24 या आर्थिक वर्षात शंभर टक्के वसुली झाली असून यात सर्व सभासदांचे सहकार्य लाभले असून पुन्हा एकदा सोसायटीच्या सर्व सभासदांचे जाहीर आभार मानले जात आहे.




