आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोऱ्यात भाजपच्या लोकसभा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट…

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांनी पाचोरा भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

राज्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युती लोकसभा उमेदवार स्मिताताई वाघ यांना आपल्या मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्ष मदत करेल असे आश्वसन देऊन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या पदाधिकारीनां सूचना केल्या असून या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्तेशी हितगुज साधून आपण आपला युतीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणून असा आत्मविश्वास दिला.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवदास तात्या पाटील, शहराध्यक्ष विनोद पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख महालपुरे सर, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, डॉ.राधेश्याम चौधरी, मधुभाऊ काटे, हर्षल पाटील, विजू अप्पा पाटील, वासू महाजन, सुनील पाटील, दीपक पाटील, प्रकाश पाटील, डॉ पितांबर पाटील, योगेश पाटील, धर्मा अण्णा, बारकू दादा, नंदूभाऊ सोमवंशी, डॉ.निळकंठ पाटील, रिपाई तालुकाध्यक्ष विनोदभाऊ अहिरे आदी उपस्थित होते.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे