आपल खान्देशमहाराष्ट्र

सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणजेच, किशोर आप्पा बारवकर….

वाढदिवस विशेष..

राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर आप्पा बारवकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना बळ देऊन शिवसेना शहरात व तालुक्यात वाढवली. पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विशेष मर्जीतले व आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदा समर्थक म्हणुन ओळख असलेले शिवसेना पाचोरा शहरप्रमुख किशोर आप्पा बारवकर हे प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शहरातील गरजूनां मदत व कधीही वेळेला धावून येणारा हक्काचा माणूस,  कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. तालुक्यात निराधाराच्या न्यायासाठी व त्यांच्या सवलतीसाठी धडपडणारा आवलिया तसेच सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला व शिवसैनिकाला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात. साधा शिवसैनिक, शहरप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख पर्यंत गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस..

शिवसेना शहरप्रमुख किशोर आप्पा बारवकर यांना वाढदिवसा सदिच्छा…

लेखन दिलीप परदेशी@ ZoomMarathiNews

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे