महाराष्ट्रराजकीय

महादेव जानकर आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून लोकसभा लढविणार..

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख तसेच धनगर समाजनेते महादेव जानकर यांना महायुती आणि महाआघाडी अशा दोन्हींकडे लोकसभा लढविण्यासाठी आशा लावून बसले होते. माढा येथून महायुतीने आपला उमेदवारी जाहीर केल्याने आणि महाविकास आघाडी परभणी द्यायला तयार नसल्याने त्यांची अडचण झाली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील भेटले असताना अचानक महायुतीने त्यांना आपल्याकडे ओढले होते. आता महादेव जानकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार यांना आपल्या कोट्यातील परभणीची जागा दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. परभणीमध्ये जानकर यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव यांच्याशी होणार आहे. आपल्या छोट्या पक्षाला सामावून घेतले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले होते. मी महायुतीला दोन जागा मागितल्या होत्या त्यातील त्यांनी एक दिली आणि महाविकास आघाडीकडे मी तीन जागा मागत होतो, त्यापैकी एकही मिळाली नाही. त्यामुळे पन्नास टक्के भागीदारी दिल्याबद्दल आपण महायुतीचे आभारी असल्याचे महादेव जानकर म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे