शिक्षण आयुक्त पुणे यांना एम पी एस सि समन्वय समितीने विविध मागणीसाठी दिले निवेदन
देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र उच्च गुणवत्ता धारक शिक्षकांची प्रत्येक शाळेवर पवित्र पोर्टल मधून निवड करण्यात यावी.
पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एम पी एस सि समन्वय समितीने शिक्षकांच्या विविध मागणीसाठी पुणे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन देण्यात आले
पवित्र पोर्टल अंतर्गत चालू असलेली उर्वरित शिक्षकभरती लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट परीक्षेचे MPSC मार्फत ऑफलाइन आयोजन विनाविलंब करणे बाबत.
तसेच महाराष्ट्रातील पात्र अभियोग्यता धारक बेरोजगारांची स्थिती लक्षात घेऊन आणि सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार लक्षात घेऊन लवकरात लवकर उर्वरित शिक्षकभरती( 2017 पासून सुरु असलेली ) पूर्ण करावी.
दर सहा महिन्यांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या जीआर नुसार कार्यवाही करावी. नियोजित 2022 अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (2 टेट) परीक्षेसाठी जाहिरात देऊन पूर्ण कालबद्ध कार्यक्रम, अभ्यासक्रम व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात यावी. यात सर्व माध्यमाच्या जागा भरण्यात याव्यात.आणि ही परीक्षा MPSC मार्फत ऑफलाइन घेण्यात यावी. आणि जवळपास महाराष्ट्रातील 50,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या याच वर्षात पूर्ण भराव्यात. आणि देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र उच्च गुणवत्ता धारक शिक्षकांची प्रत्येक शाळेवर पवित्र पोर्टल मधून निवड करण्यात यावी असे बोलताना सांगितले.


