आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

Pachora | युवासेना पाचोरा उपशहर प्रमुखपदी प्रेमराज पाटील यांची नियुक्ती…


  • दिलीप जय परदेशी

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन तसेच युवासेना पाचोरा तालुकाप्रमुख अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार प्रेमराज पाटील यांची युवासेना उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली.

पाचोरा शहरात सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेल्या प्रेमराज पाटील यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी युवासेना जळगाव जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन तसेच युवासेना पाचोरा तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख सूरज शिंदे, भोला पाटील, अक्षय देशमुख आदी युवासेना सदशय उपस्थित होते.

यानिवडी नंतर बोलताना प्रेमराज पाटील यांनी सांगितले की, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शिवसेना – युवासेनेची ध्येय धोरणे राबवून पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करणार आहे. तर तरुणांने संघटना मजबुत करण्यासाठी विशेष पर्यत करणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे