आपल खान्देशमहाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी चाळीसगावचे संदीप लांडगे यांचे नियुक्ती…

  • दिलीप जय परदेशी

चाळीसगाव ( झूम मराठी) उत्तर महाराष्ट्रात धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ ओळखली जाते, या संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संदीप दादा लांडगे यांचे नियुक्ती झाल्याने समाज माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

महापराक्रमी राजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या पराक्रमाला साक्षी ठेवून, महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी रयतेसाठी चालवलेले राज्याचे स्मरण नेहमी राहावे. आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन समाजकार्य करावे म्हणून सदर पदावर नियुक्ती केली आहे, संदीप दादा लांडगे यांची नियुक्ती उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ संस्थापक सल्लागार बापूसाहेब हटकर यांच्या आदेशाने आणि ज्ञानेश्वर परदेशी यांच्या संमतीने केली गेली आहे.

आपले ध्येय धनगर आरक्षण मिळवणे. वाड्या, वस्त्या, डोंगराळ भागातील शेवटच्या धनगर समाज बांधवांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन संदीप दादा लांडगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे