आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करून कारवाई…

पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली येथे पाचोरा पोलिसांच्या पथकाने पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली आहे. या पथकात पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पथकाने ही धाड टाकली.या प्रकरणी संशयित मल्हारी कोळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली येथे पाचोरा पोलिसांच्या पथकाने पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली आहे. या पथकात पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो. कॉ. विश्वास देशमुख, पो. कॉ. योगेश अरुण पाटील, पो. कॉ. योगेश सुरेश पाटील, होमगार्ड किशोर जगताप, कपिल पाटील, कल्पना निंबाळकर, सोनाली पाटील या पथकाने सदरची कारवाई करत ३१ हजार १०० रुपयांचा अवैधरित्या सुरु असलेल्या दोन गावठी दारु हातभट्ट्‌या उद्ध्वस्त केल्या आहेत. सदरची कारवाई २२ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. मल्हारी कोळी (वय – ५३) रा. अंतुर्ली ता. भडगाव यांच्या सह अन्य एका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे. या धडक कारवाई मुळे परिसरातील अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु पाडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे… अवैधरित्या गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे पाचोरा पोलीस विभागाच्या वतीने वर्तविण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे