आपल खान्देशकृषीवार्ता

धुळ्यातील साक्री तालुक्यातील एका शिवारात बिबटयाची हंड्यात अडकली मान, अथक प्रयत्नाअंती सुटका…

पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची (Leopard) मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी दाखल झाल्याने अखेर बिबट्याची झाली सुटका.

साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील जयरामनगर पैकी धुकशेवड शिवारातील कृष्णा नारायण चौरे (रा.देवळीपाडा) यांच्या शेतात गुरांच्या वाड्यात भक्ष व पाण्याच्या शोधात एक मादी जातीचा बिबट्या आला. तांब्याच्या हंड्यात पाणी असावे म्हणून त्याने पिण्यासाठी मान आत घातली, मात्र त्याची मान या हंड्यात अडकली. त्यानंतर तो वाड्याच्या आजूबाजूला सैरावैरा पळत सुटला बिबट्या पूर्णतः हैराण होऊन दमून वाड्यात जाऊन बसला. 

  • शेतमालकाने वन अधिकाऱ्यांना दिली माहिती

ही घटना पाहून शेतमालकाने पहाटे तीन वाजता वन अधिकारी सविता सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी ही बाब उपवनसंरक्षक नितीन कुमारसिंग यांना कळवली. त्यानंतर पिंजऱ्यासह वन कर्मचारी व वन्यजीव संस्था, पिंपळनेरचे पथक व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची मान अडकल्यामुळे तो थकला होता. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता.

  • मान हंड्यात अडकल्याने बिबट्याला ऑक्सिजनची कमतरता  

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शनद्वारे भूल देऊन त्यास बेशुद्ध केले. पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला पिंपळनेर वनविभागाच्या आवारात आणण्यात आले. या ठिकाणी साक्री तालुक्याचे पशुधन आयुक्त अधिकारी डॉ.योगेश गावित, डॉ.मंगेश हेमाडे, डॉ.संदीप कोकणी, डॉ.शंकर आस्वार, डॉ. राहुल पाटील यांनी या बिबट्यास पुन्हा इंजेक्शन द्वारा भूल दिली. बिबट्यास ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याची मान आतमध्ये अडकल्याने तो अतिशय बेभान झालेल्या असल्यामुळे शक्य झाले नाही. त्यानंतर येथील कारागीर मुस्ताक शेख यांनी कटरच्या साह्याने तांब्याच्या हंड्याला दोन ते तीन ठिकाणी चरे देऊन ऑक्सिजन आत पोहोचेल अशी योजना केली. बिबट्याला ऑक्सिजन मिळताच बिबट्या सुस्थितीत आला. 

  • अखेर बिबट्याला मान हंड्यातून काढण्यात यश

एकीकडे हंडा पकडून व एका बाजूने बिबट्याची शेपूट पकडून हंडा ओढला असता बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली. पुन्हा बिबट्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची तब्येतीत आता सुधारणा आहे. बिबट्यास सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल अडकिने, वन अधिकारी सविता सोनवणे यांनी सांगितले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे