आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा शहर भाजप युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर, योगेश ठाकूर यांची शहरध्यक्ष पदी नियुक्ती..

शहरातील नवीन युवा चेहऱ्यांना संधी..


पाचोरा (झूम मराठी) येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडूणुकीत भाजप सह प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी निवडणूकीच्या मैदानात सज्ज झाला असून त्यातच भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांनी अमोल भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरात महत्त्वपूर्ण कार्यामुळे युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी योगेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,जळकेकर महाराज यांच्या आदेशाने विधानसभा निवडणूक प्रमुख तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेशभाऊ पाटील, भाजपा शहराध्यक्ष दिपकभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी योगेश मधूकर ठाकूर यांची नियुक्ती सह पाचोरा शहर कार्यकारणी जाहीर केली. 

शहरातील विविध भागांतील तरुणाना संधी मिळाली असून या नियुक्तीने भाजपा युवा मोर्चा पाचोरा शहराला संघटनात्मक फायदा होईल. भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी योगेश ठाकुर, शहर उपाध्यक्ष पदी भावेश नारायण पटेल, आशिष रामदास जाधव, राकेश राजेंद्र चौधरी, शुभम अनिल पाटील, विजय नाना महाजन, आतिश ज्ञानेश्वर चौधरी, शुभम रामचंद्र पाटील, रविंद्र रामा देवरे, सरचिटणीस पदी रोहन महेंद्रकुमार मिश्रा, उदय सुनिल सूर्यवंशी, योगेश भोजू लोणारी, चिटणीस पदी विजय सिताराम पाटील शे. मुस्तकीम शे. मोहम्मद बागवान, अक्षय तुकाराम शिंदे, सागर ईश्वर पाटील, अमोल सुनिल नाथ, राहुल राजेश टेकम, गितेश अनिल गुंजाळ, दिपक रघुनाथ पाटील, कोषाध्यक्ष आकाश कन्हैय्यालाल रत्नानी, सोशल मीडिया प्रमुख निलेश दगडु चव्हाण, मीडिया प्रभारी राहुल भगवान जाधव, कार्यालय मंत्री कमलेश रामदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे