अखेर.. पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी आपले वजन वापरत भडगाव येथे आरटीओ कार्यालय करून दाखवले..
राज्य शासनाने चाळीसगावला आरटीओ कार्यालयास मंजुरी देऊन एक दिवस उलटत नाही तोच भडगाव येथे देखील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून चाळीसगाव येथे एआरटीओ कार्यालय मंजूर करून आणले असून याचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे. या निर्णयाचे भडगाव येथे पडसाद उमटून याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. एक दिवशीय बंद पाळण्यात आला दरम्यान, पाचोरा भडगावचे स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पाठपुरावा करत भडगाव येथे देखील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी मिळवून आणली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. चाळीसगावच्या एआरटीओ कार्यालयास एमएच-५२ हा संकेतांक मिळाला असून भडगाव येथील वाहनांना नोंदणी करतांना एमएच-५४ असा संकेतांक मिळणार आहे असे स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संगितले



