आपल खान्देशआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रराजकीयविदर्भसखी

फेसबुक, इन्स्टाग्राम युजरचे अकाउंट आपाओप लॉगआऊट..

जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन झालं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजरचे अकाउंट आपाओप लॉगआऊट होत आहेत. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम युजर बुचकाळ्यात पडले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन नेमकं का डाऊन झालं, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जगभरातील फेसुबक, इन्टाग्राम युजरचे अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत आहेत. फेसबुक आणि इन्टाग्राम अकाऊंट अचानक लॉगआऊट झाल्याने युजर्सचा गोंधळ उडाला आहे. फेसबुक सुरु केल्यानंतर युजर्संना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड मेसेज आला. त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगआऊट झाले आहे.

फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पासवर्ड नाकरला जात आहेत. तुम्ही फेसबुकच्या होम पेजवर गेल्यावर फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढत आहे. फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याता प्रयत्न केला तर एरर मेसेज येत आहे. त्यानंतर पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जात आहे.

दुसरीकडे इन्स्टाग्रामवरही त्याचप्रकारचा मेसेज येत आहे. त्यामुळे पासवर्ड बदलण्याची गरज नाही. कारण जगभरातील इन्स्टाग्राम आणि फेसबुक सेवा विस्कळीत झाली आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे