आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

लोहाराच्या डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात


दिलीप राजपूत प्रतिनिधी.

लोहारा (झूम मराठी) डॉ.जे .जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज( वि वा शिरवाडकर )यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ.अ. पटेल सर यांच्या संकल्पनेतून मुलांना मराठी भाषेचं महत्त्व कळावं यासाठी व खानदेश मधील कवी यांची ओळख व्हावी यासाठी शाळेमध्ये विविध कवी यांच्या कविता त्यांचे लेख व छायाचित्र यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष विश्वास भाऊ पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी राज्य साहित्य संमेलन पुरस्कार प्राप्त व ‘पांगल्या पायवाटा ‘ या प्रसिद्ध कविता संग्रहाचे कवी व खानदेशी कवी ओळख असलेले श्री .टी जे पाटील साहेब( माजी अभियंता) ,श्री अ. अ. पटेल सर हे होते कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस टी चिंचोले सर विद्यालयाच्या उपमुख्यध्यापिका सौ यू डी शेळके मॅडम तसेच विद्यालयाचे पर्येवेक्षक पी .एम सुर्वे सर हे होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले . त्याचबरोबर विद्यालयातील उपशिक्षक श्री इंगळे सर यांनी मराठी भाषा व तिचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच विद्यालयाचे उपशिक्षक श्री खोडपे सर यांनी मराठी भाषेचा इतिहास मुलांना सांगितला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले टी.जे पाटील सर यांनी आपल्या कवितेमधून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजून सांगितले चे अध्यक्षीय मनोगतामध्ये विश्वासरावभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक बी.एन.पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री . इंगळे सर यांनी मानले कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे