आपल खान्देश
पाचोऱ्यात आठवडे बाजारात उसाने भरलेला महिंद्रा मॅजिक वाहन खड्यात पलटी, सुदैवाने जिवीत हानी नाही!
पाचोरा (प्रतिनिधी) आज दुपारी 3-45 च्या सुमारास महेंद्र कंपनीची MH 04-HD5410 या क्रमांकाची गाडी आठवडे बाजारात पलटी झाला, उपस्थिती असलेले जागृत युवकांनी वाहन चालक व क्लीनर यांना सुखरूप बाहेर काढले.
सविस्तर वृत्त असे की आज पाचोरा शहरात आठवडे भरला होता सुमारे तीन वाजेच्या दरम्यान उसाने भरलेला महिंद्रा मॅजिक (MH 04-HD5410) या क्रमांकाची गाडी या आठवडे बाजारातील खड्यात पलटी झाली. बाजारात तारांबळ उडाली जागृत नागरीकानी वेळेचा विलंब नकरता पलटी झालेला महिंद्रा मॅजिक वाहना चालक व क्लीनर यांना सुखरूप बाहेर काढून वाहन हातभार लावून सरळ केला, जगदीश पाटील, सरदार भाई, मतीन बगवान, सचीन चौधरी, मतीन टकारी, विनोद पहेलवान, सागर पाटील, अण्णा चौधरी, वसीम शेख, गणेश कोळी, खैरनार, पवन पाटील या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे
या बाजारात पाचोरा तालुक्याचा मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो शनिवारच्या दिवशी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या आठवडे बाजारात मंदिरे व मज्जीद एका ठिकाणी असून हिंदू मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसदिवस वाढ होत आहे



