गुन्हेगारीब्रेकिंग

मुंबई हादरली! निर्भया घटनेची पुनरावृत्ती!

मुंबई हादरली! निर्भया घटनेची पुनरावृत्ती!

देशाला हादरून टाकणाऱ्या दिल्ली निर्भया बलात्काराच्या घटनेची आज मुंबईत पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या साकीनाका परिसरात घडली आहे. येथे एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकल्याचा संतापजनक घटना घडली आहे.

मुंबईतील साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर हैवानांनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय.

दरम्यान, मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. याप्रकरणी पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं आवश्यक आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे