आपल खान्देशमहाराष्ट्र

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन नाद्रा माहेजी येथील तरुणांचा शिवसेना प्रवेश..

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचं काम सुरू आहे. पाचोरा भडगावचे शिवसेना आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन पाचोरा तालुक्यातील नांद्रा माहेजी गावातील अनेक तरुणांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. 

किशोर बारवकर, पदम बापु पाटील, पंढरी आण्णा, जितेंद्र जैन, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज नांद्रा व माहेजी येथील संदीप सूर्यवंशी, जितेंद्र बडगुजर, आनंदा बोरसे, सुकलाल जोहरे, समाधान पाटील, गौतम साळवे, आरिफ याकूब, विनोद पाटील, भालचंद्र भिल, वासुदेव पाटील आदी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आप्पासाहेबांनी सगळ्यांचे स्वागत करत सत्कारही केले. तसेच यावेळी अल्पसंख्यांक शहरप्रमुख पदी मा. रफिक शेख यांची नियुक्त करत शुभेच्छा दिल्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे