महाराष्ट्र

‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मोठया प्रमाणात राबवा – मुख्यमंत्री

कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स केला

  • सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले

  • लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स

  • दोन्ही टास्क फोर्समध्ये वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद

  • सर्व खासगी डॉक्टर्सना सहभागी करून व्याप्ती वाढविण्यासाठी ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन

  • मुंबईतील १ हजार फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन यांच्याशी संवाद

  • राज्यभरातील १७ हजार फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन यांच्याशी संवाद

  • महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या माध्यमातून २१ हजार ५०० डॉक्टर्सची परिषद

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे