पाचोरा पालिका प्रशासनाची कर वसुलीसाठी, ढोल बजाओ पथक!
पाचोरा (झूम मराठी) नगरपालिकेने करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी, घरपट्टी, जागाभाडे गाळाभाडे, थकबाकी वसुलीसाठी पालिका प्रशासक स्वतः फिरून धडक कारवाई करीत आहेत.
धडक पाचोरा नगरपरिषदेच्या विविध करवसुलीची मोहीम प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी सुरू केली आहे. वारंवार सूचना नोटिसा देऊन, जनजागृती करून देखील थकबाकी वसुली होत नसल्याने दि. २० मार्चपासून धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील नवकार प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील १९ व्यापारी गाळे सील करण्यात आले आहेत. अशीच कारवाई माञ मोठ्या श्रीमंत लोकांच्या बाबतीत होताना दिसत नाही.
अशी सर्वत्र चर्चा असुन त्यातच हा कारवाईचा बडगा छोटे व्यावसायिक व भाडेकरू यांनाच जास्त सहन करावा लागत आहे. नगर पालिकेचे विविध कॉप्लेक्स मधील गाळ्यांच्या बाबतीतही अशी करवाई झाल्यास सर्वांचाच यास विरोध राहणार नाही तोंड पाहून किंवा विशिष्ठ तथा कथित VIP यांना ही या कारवाईस सामोरे जावे लागेल असे तरी या कारवाई वरून दिसते . शहरातील ज्या थकीत मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडे येणे असलेली थकबाकी भरलेली नाही. अशा थकबाकीदारांच्या घरासमोर मोठमोठ्याने ढोल वाजवून वसुलीची धडक कार्यवाही सुरू आहे. तरीदेखील थकबाकी न “भरल्यास त्यांचे नळकनेक्शन बंद करण्यात येत असून, नगरपरिषदेने ज्या कोणा थकबाकीदाराकडे थकीत रक्कम येणे असेल, त्यांनी त्वरित भरावे असे शहरातील जागाभाडे, गाळाभाडे थकबाकीधारकांनीही थकबाकी त्वरित भरावी अन्यथा त्यांचा गाळा सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.



