आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून मुंबईच्या पोलीसाचा बळी…

चाळीसगावात क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. या घटनेत मुंबई पोलीस असलेल्या शुभम आगोणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यानां खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चार मारेकऱ्यांना संशयित म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे