लढुंगा नही तो जितुंगा कैसे? संघर्ष का वारीस हू, रूकुंगा कैसे
जात, पात, धर्म ,पंथ, पक्षसंघटना, या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवून काम करत राहणारा एक अवलिया, म्हणजेच सचिनदादा सोमवंशी
वाढदिवस विशेष
सचिन दादा सोमवंशी एक सच्चा समाजसेवक भविष्यात पाचोरा भडगाव भावी आमदार होईलच यात तिळमात्र शंका नाही, सर्व सामान्य लोकांचा खरा मनातील आमदार….
सुखात नाही पण दुःखात नक्कीच साथ देणारा कोट्यावधी रुपये देऊनही दादा ही उपाधी मिळणार नाही मात्र गोरगरीब जनतेचे काम करून असंख्य बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा भल्याभल्यांना आश्वासक असा मदतीचा हात देणारा एक मजबूत हात एक मजबूत नेता सर्वांना हवाहवासा वाटणारा मोठा भाऊ म्हणजे काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांना आभाळभर शुभेच्छा!
जात, पात, धर्म ,पंथ, पक्षसंघटना, या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवून काम करत राहणारा एक अवलिया..


लढुंगा नही तो जितुंगा कैसे ? संघर्ष का वारीस हू… रूकुंगा कैसे! असं म्हणणारा सचिन दादा सदैव लढतांना झुंज देताना व काम करताना दिसतात शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, वैयक्तिक, काही अडचणी असोत दादांकडे आलेला माणूस काम न होता कधीच परत जात नाही तालुक्यात अपघात झाला की तेथे सचिन दादा मदत करीत तेथे उभे असतातच, आपल्या पोटापुरता व्यवसाय करून मिळवणारा हा माणूस अप्पल पोट्या नाही घासातला घास घेऊन सर्वसामान्य जनतेस आपलंसं करणारं व्यक्ती महत्त्व सर्वांना जवळच वाटतंय आदरणीय सचिन दादा सोमवंशी हे नाव खेड्यापाड्यातील गरीब दुबळ्या तरुणांच्या मनामध्ये रुजत चाललय कधीच कुठला छल कपट नाही राजकीय डावपेच नाही जे करायचं ते करायचं अगदी मनापासून मग त्यासाठी सर्वस्व कामी आले तरी चालेल या विचाराने प्रेरित झालेला एक सच्चा समाजसेवक भविष्यामध्ये पाचोरा शहर आणि तालुक्याची नवीन ओळख ठरू शकेल यात शंकाच नाही मा.सचिन दादा आपल शारीरिक, मानसिक, आर्थिक राजकीय, आरोग्य चांगले राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.




