आपल खान्देशगुन्हेगारी
चाळीसगावात चॉकलेटच्या देण्याचा बहाणा करून आकरा वर्षी मुलीचा केला बलात्कार..
चाळीसगावात एका परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीला चॉकलेट देऊन तिला शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
याप्रकरणी अफरखान राऊत खान (२२, रा. चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १३ रोजी दुपारी आरोपीने तिला चॉकलेट खाण्यास दिले. नंतर तिला १०० रुपये देऊन शेजारच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी या घटनेची फिर्याद दिली. त्यावरून त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.



