आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी किशोर बारावकर यांची वर्णी….

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा (झूम मराठी) शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख पदी पाचोरा शहरप्रमुख किशोर बारावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन किशोर बारावकर यांची यांची वर्णी लागल्याने पाचोरा शहर, व तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी मध्ये आनंद व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्हा शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आता शिवसेनेने (Shiv sena) कंबर कसली असून आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघात कामाचा धडाका सुरु असताना याच मतदार संघातून युवासेना जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन यांची नियुक्ती नंतर आता शिवसेना पाचोरा शहर प्रमुख किशोर बारावकर यांची शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख पदी वर्णी लागल्याने शिवसेनेत सर्व सामान्य पधादिकारीनां मानाचे स्थान मिळते हे दिसून आले..

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळख असलेल्या शिवसैनिक किशोर बारावकर यांनी पाचोरा शहरप्रमुख पद तब्बल 10 वर्ष यशस्वीपणे हाताळले, बारावकर आप्पा शिवसैनिकांसाठी वेळोवेळी मदतीला धावून येतात व सामाजिक कामात ते अग्रेसर असतात. पाचोरा शहर असो, इतर भागात देखील ते शिवसैनिक व पदाधिकारीशी संपर्क ठेवून आहेत. ते त्यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे