ब्रेकिंग

पाचोऱ्याच्या खुशी अतुल संघवी CA परिक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण….


पाचोरा – दि पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी यांची कन्या कु.ख़ुशी अतुल संघवी हिने ICAI तर्फे घेण्यात आलेल्या CA फाइनल परिक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन तिच्या कुटुंबाचे, शहराचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने तीनही पेपरमध्ये प्रथम श्रेणी मिळवून एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

ख़ुशीने 2021 मध्ये मुंबईतील प्रतिष्ठित N M College येथून बारावीमध्ये पहिल्या दहामध्ये उत्तीर्ण होऊन सुरुवात केली. त्यानंतर तिने मुंबईतील ICAI चेंबर्स ऑफ कॉमर्समधून CA इंटर सुध्दा प्रथम प्रयत्नात पूर्ण केले. 2022 मध्ये तिने CA फाइनल परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन इतिहास रचला. तिने तीनही पेपरमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे. ख़ुशीच्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि परिचितांनी अभिनंदन केले आहे. तिच्या वडिलांनी तिला शुभेच्छा देत तिला पुढील वाटचालीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ख़ुशीने आपल्या यशाबद्दल सांगितले की, “मला लहानपणापासूनच लेखापाल व्हायचे होते. मी माझ्या मेहनती आणि परिश्रमातून हे यश मिळवले आहे. मी माझ्या घरातील वडीलधारी मंडळी व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली माझे ध्येय साध्य केले आहे.”

ख़ुशीने पुढे सांगितले की, “मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या घरातील वडीलधारी मंडळी माझ्या पालकांना, माझ्या शिक्षकांना आणि माझ्या मित्र परिवारास देते. मी माझ्या यशामुळे इतर तरुणांना प्रेरित करू इच्छिते की, जर त्यांनी मेहनत आणि परिश्रम केले तर ते कोणतेही यश मिळवू शकतात.” ख़ुशीच्या या यशाबद्दल शुभेच्छा! तिच्या यशामुळे इतर तरुणांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे