रुपाली चाकणकरांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा
चाकणकरांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे
झूम मराठी
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे रुपाली चाकणकरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
चाकणकरांनी पुण्यातून राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा म्हणून काम करत होत्या. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आणि यानंतर चाकरणकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदी रुपाली चाकणकरांची नियुक्ती करण्यात आली. दौंड येथील शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून चाकणकरांनी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकरणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. या माध्यमातून रुपाली चाकणकर यांचा राजकारणात प्रवेश केला.
दरम्यान, चाकणकरांनी २००२ पासून ५ ते ६ वर्षं महिला बचतगटामध्ये काम केले आहे. यानंतर चाकणकरांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष पद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थांने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. चाकणकरांचे काम पहाता त्यांना पुणे शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यानंतर चित्रा वाघ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चाकणकरांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.



