पाचोरा शहरात संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..
झूम मराठी
पाचोरा:- श्री संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळा गजानन महाराज मंदिर, पुनगाव रोड, पाचोरा येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. प्रथम कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सन २०२०-२१ या कोरोना काळात व वृद्धापकाळाने, अकाली मृत्यू झालेल्या सर्वांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री. संत शिरोमणी सेनाजी महाराज रथाचे पूजन सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल श्रावण अहिरे यांनी सपत्नीक पुजन केले. व गुणवंतांना योग्य ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून आलेले पदाधीकारी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संपर्क प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. श्री. किशोरभाऊ सूर्यवंशी हे होते महाराष्ट्र नाभिक महामंडळ तसेच जिल्हाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघ जळगाव तसेच श्रीमती, अलकाताई सोनवणे (जन सेवा पक्ष व पोलीस क्राईम रिपोर्टर), महाराष्ट्र नाभिक महामंडळ जेष्ठ पत्रकार मोहन दादा साळवी, कर्मचारी संघटनेचे जिल्हा नेते रवींद्रजी बोरनारे, महा. पोलीस रिटयार्ड अधिकारी नारायण दादा सोनवणे, नाशिकहून आलेले वारुळेदादा, जेष्ठ सल्लागर श्री. भास्कर हरी सान्नासे, श्री. बारकू सोनवणे, जेष्ठ मार्गदर्शक श्री. काशिनाथ सोनवणे, श्री रामभाऊ खाँडे (म.ना. महामंडळ) हे पदाधिकारी व्यासपिठावर होते तसेच पाचोरा शहाराचे नाभिक समाज अध्यक्ष श्री. रमेश दादा जाधव यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. कल्याणरावजी दळे साहेब मुंबई यांच्या आदेशाने महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा / जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. हि घोषणा व्यासपिठावरील सर्व पदाधिकार्यांनी केली. तसेच पाचोरा नाभिक समजाचे अध्यक्ष यांच्या श्री. रमेश दादा जाधव यांचा वाढदिवस श्री संत सेनाजी महाराज याच्या पुण्यतिथीलाच असतो. म्हणून अध्याक्ष्यांनी कार्यक्रम स्थळी त्यांनी केक कापला. सर्व मान्यवरांनी तसेच पाचोरा शहर समाज व मित्र मंडळ त्यांना सदिच्छा भेट शुभेच्छा दिल्यात.

कार्यकम यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश दादा जाधव, श्री. अनिल अहिरे, श्री. जगन्नाथ सोनवणे, श्री. योगराज सोनवणे, श्री. रमेश सोनवणे, श्री. सुनील अहिरे, श्री. दीपक चित्ते, श्री. जितेंद्र सोनवणे, श्री. गुलाब ठाकरे, श्री. अनिल चित्ते, श्री आकाश जाधव, श्री. प्रमोद पिडिहार. श्री. मनोज ठाकरे, श्री. नितीन वारुळे, श्री. सुरेश चित्ते, श्री. राकेश अहिरे, श्री. पिंटू भाऊ वाघ (भोजे चिंचपुरे), श्री. संदीप अहिरे, श्री. कैलास अहिरे (वेध ग्राफिक्स), श्री. कैलास वाघ, श्री. रमेश चित्ते, श्री. विजय मानकरे, सौ. शोभा जाधव, सौ. कल्पना अहिरे, सौ. सोनवणे ताई, कु. मनिषा जाधव, चि. मोहित जाधव, चि. हर्षल जाधव, चि. दर्शन पिडिहार, इ. परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन :- श्री. दिपक चित्ते यांनी केले. त्याच बरोबर प्रस्ताविक अध्यक्ष श्री. रमेश दादा जाधव यांनी केले. श्री. योगराज सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.
श्री. संत शिरोमणी सेना महाराजाचा रथ मिरवणूकीचा कार्यक्रम दुपारी ०३.०० पार पडला. मिरवणुकीत महिलासाठी साडीचा लकी ड्रॉ काढण्यात येत होते. रथ यात्रेत केवलगिरी बँड पथकाची भक्ती पर गीत तसेच सेना महाराज गीत सेना महाराजांचे अभंग गाऊन सर्वांना मंत्र मुग्ध केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते स्कूल बॅग, ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थी मनोगत :- कु. मनिषा रमेश जाधव यांनी समाजावर आधारित प्रबोधन पर समर गीत म्हटले.
स्मृती प्रित्यर्थ (स्मरणार्थ बक्षिसे वाटप केले) : भूखंड देणगीदारांचा सत्कार करण्यात आले.
रात्री ०८ ते १० या वेळेत श्री. ह.भ.प. बबनजी महाराज धरणगावकर यांचा सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.



