३० मे सोमवती आमवस्या दिनी अहिल्यादेवी जयंती पुर्वसंध्येला पंचवटी महाकुंभ मेळा भरणार..
ऐन सोमवती आमवस्या या दिवशी आली असुन या जयंती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
झूम मराठी न्यूज नेटवर्क
नाशिक(झूम मराठी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार(सोमवती आमवस्या) दि.३० रोजी रामकुंड पंचवटी, नाशिक येथे नभुतो नाभविष्य असा दैदिप्यमान जयंती सोहळा संपन्न होणार आहे.
ऐन सोमवती आमवस्या या दिवशी आली असुन या जयंती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी या शिवभक्त होत्या, भारतातील अनेक नदीकाठी त्यांनी शंकराचे मंदिरे बांधली, त्यात नाशिक गोदावरी काठी काशी विश्वेश्वर महादेवाचे मंदिर बांधले.
सोमवती आमवस्याला दिपदान, अन्नदान,गोदास्नानाचे विशेष महत्त्व आहे.पित्रुदोष,कष्ट, अडचणी,दारीद्रय, पारिवारीक समस्या दुर होतात.अस शास्त्र सांगते, हाच दुग्धक्षर्करा योग सोमवार ३० मे रोजी आला आहे. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे पुजन,ढोलपथक झांजच्या तालावर गोदाआरती, दिपोत्सव,आणि पिवळ्या भंडार्यांची उधळण यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय होणार आहे.
आलेल्या सर्व समाज बांधवांच्या हातुन गोदावरी मातेला हजारों दिवे लावण्यात येईल. दिव्यांची व्यवस्था उत्सव समिती ने केली आहे तसेच प्रत्येक समाजबांधवांच्या हस्ते गोदाआरतीचे पुजन होईल असे नियोजन केले जाईल. यासाठी आपणास फक्त पुजेचा ताट,आक्षदा आणि कापुर आणायचा आहे. अहिल्यादेवी होळकर जयंती आणि सोमवती आमवस्या हा योग अतिशय दुर्मिळ आहे,
मंदीरावर रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. या कार्यक्रमास साधुसंत, पुरोहित, राजकिय क्षेत्रातील नामवंत नेते यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मधुर व्याख्यानाचा आपणास ऐकावयास मिळणार आहे.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल आपण सर्वांनी या अद्भुत भव्यदिव्य कार्यक्रमाचा बघता येईल.
सोमवार (सोमवती आमवस्या) दिनांक ३० मे वेळ सायंकाळी ५.३० ते ८.३० राखीव ठेवा.वर्षाचे फक्त ३ तास समाजासाठी)
आयोजक- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, नाशिक.



