आपल खान्देशब्रेकिंग

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर-बोदवड रेल्वे मार्गासाठी ९५५ कोटी रूपये निधी..

  • झूम मराठी ऑनलाईन

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर-बोदवड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत सुमारे ९५५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे आणि त्याकरिता शासनामार्फत १०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर-बोदवड हा मीटरगेज रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेज होणार आहे. पाचोरा-जामनेर या मार्गावर धावणारी ब्रिटीशकालीन रेल्वे गाडीचे प्रवाशांमध्ये मोठे आकर्षण होते. ५३ किमी अंतरात धावणारी ही पीजे रेल्वे विशेषतः पाचोरा आणि जामनेर तालुक्यात लोकप्रिय होती. काळानुसार या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी जोर धरू लागली. राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या. पाचोरा-जामनेरच्या पुढे बोदवडपर्यंत या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. जेणेकरून भुसावळ-मनमाड दरम्यानच्या व्यस्त मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्या पाचोरा-जामनेरमार्गे थेट बोदवड स्थानकाकडे वळविणे शक्य होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाचोरा-जामनेर-बोदवड नवीन रेल्वे मार्ग विस्तारीकरण प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांसोबत जामनेर भाजप कार्यालयात बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे