पाचोरा तालुक्यातील आखतवाड्यात लोकवर्गणीतून साकारले ग्रंथालय …
- दिलीप जय परदेशी
गाव करील ते राव करील काय… अशी एक म्हण आहे त्याचा प्रत्यय पाचोरा तालुक्यातील आखातवाडे या गावातून आला, गावात वाचनालय नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त ग्रंथसंपदा वाचण्यास मिळत नव्हती, माऊली फाउंडेशनच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून ग्रंथालय उभारण्यात आला त्याचे आज उदघाटन करण्यात आल्याने आंनद व्यक्त होताना दिसून येत आहे.
समाज मोठी मोठी कामे उभी करू शकतात. मंदिरे, शाळा लोक वर्गणीतून बांधलेली आपण गावोगाव पाहत आहोत. मात्र आपण ज्ञानाचे मंदिर लोकवर्गणीतून उभारले याचा विशेष आनंद आहे.

ग्रंथालय ही ज्ञानाची देवालये आहेत. असे महात्मा गांधी नेहमी म्हणत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वतः चे घर हे वाचनालय करून टाकले होते. त्या घराचे नाव आहे राजगृह.शहीद भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी 113 दिवसाचे जेलमध्ये पुस्तके वाचण्यास मिळावे म्हणून उपोषण केले. समाजाला जागरूक करायचे असेल तर वाचनालयाच्या माध्यमातुन जागरूक करता येवू शकत.’ जो नाही वाचत पुस्तक, तो कोणाचाही होईल हस्तक ‘ आपण कुणाचेही हस्तक होता कामा नये यासाठी लायब्ररीची गरज आहे. राज्यातील राजकारणात पोरं चोरणारी टोळी फिरते आहे. त्यापासून सावध व्हायचे असेल तर पुस्तके वाचली पाहिजेत.असे मत आखतवाडे येथील लायब्ररी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिवसेना नेत्या वैशालीताई नरेंद्र सूर्यवंशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी व्यक्त केले.
अश्या लायब्ररी आपल्या संपूर्ण पाचोरा – भडगाव तालुक्यात झाल्या पाहिजेत असे आवाहनही या निमित्ताने केले. ज्या ज्या लोकांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन प्रसंगी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ, संगीता गढरी, बापू दयाराम गढरी, प्रवीण राजपूत, अशोक राजपूत, राहुल राजपूत, प्रकाश गढरी, प्रमोद पाटील, दीपक गढरी, रमेश गढरी, दिघी गावाचे सरपंच . रामधन परदेशी, बदरखे गावाचे पोलीस पाटील काशिनाथ गढरी, आखतवाडे गावाचे पोलीस पाटिल दगडु गिरासे, युनुसखा पठाण व गावातील नागरिक उपस्थित होते.




