पाचोरा ठाकरे गट शिवदिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठया उत्साहात संपन्न ..
पाचोरा ठाकरे गट शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाचोरा भडगाव यांच्या शुभहस्ते तथा दीपक सिंग राजपूत शिवसेना जिल्हाप्रमुख व अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मोठया उत्साहात उत्साहात संपन्न झाला.
शिव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिव दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण नोंदी व दैनंदिन जीवनातील दिनदर्शिकेचे महत्त्व विशद केले तसेच माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मतदार संघावरील दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या वरील नितांत प्रेमाची आठवण करून दिली वर्षभरातील त्यांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याच्या आढावा मांडला तसेच अरुण पाटील यांनी येत्या 23 डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या माननीय सौ. वैशालीताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची रूप रूपरेषा पत्रकार बांधवांना समोर मांडली याकार्यक्रमात श्री राहुल संगवी संचालक मार्केट कमिटी पाचोरा यांच्या केक कापून वाढदिवस साजरा केला गेला यावेळी दीपक पाटील उपजिल्हाप्रमुख भडगाव, शरद पाटील तालुकाप्रमुख, अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा, विनोद बाविस्कर, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, मनोहर चौधरी संदीप जैन युवा उपाधिकारी, शशिकांत पाटील, राजेंद्र राणा, पप्पू सावंत, दादाभाऊ चौधरी, मनोज चौधरी, आनंद संघवी, राहुल सांगवी, गफार भाई, ज्ञानेश्वर चौधरी, समाधान हटकर, खंडू सोनवणे, हरीश देवरे अभिषेक खंडेलवालn विनोद राऊत धरमसिंग पाटील, गांगुर्डे साहेब डीडी नाना, नंदू सर, राजू गायकवाड, शुभम राजपूत, सुनील पाटील सर आदी उपस्थित होते संचालन प्रस्ताविक नाना वाघ यांनी केले.



