Kakan Bardi | गिरडच्या जवाहर हायस्कूलच्या विध्यार्थीनीं केले काकनबर्डी परिसर चकाचक..
- दिलीप जय परदेशी
गिरड ता. भडगाव (झूम मराठी) दरवर्षी चंपाषष्ठीला काकणबर्डी ता पाचोरा येथे खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या दुसर्या दिवशी या परीसरात मोठी घाण आणि कचरा, निर्माल्य सर्वत्र पसरलेले असते त्यामुळे परिसरात अस्वच्छता असते दरवर्षी गिरडच्या जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या परीसरात स्वच्छ व सुंदर दिसावा यासाठी स्वच्छता अभियान राबविले जाते.

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गिरड च्या वतीने या परीसरात यात्रेच्या दुसर्या दिवशी स्वच्छता मोहीम ११ वर्षापासून राबविली जाते आहे. यावर्षीही कनिष्ठ महाविद्यालयाच्या जवळपास शंभर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व परीसरात स्वच्छता केली. सदर अभियानाचे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, व्हाइस चेअरमन पुनमताई प्रशांतराव पाटील, सचिव प्रशांतदादा पाटील, यांच्या प्रेरणेने व प्राचार्य बी. वाय. पाटील, पाचोरा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांनी कौतुक केले. अभियान यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यवाह उत्तमराव पाटील, प्रा डी डी भोसले, प्रा. एन. एम. भागवत, प्रा. बी. जी. भदाणे, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. पी. जी. पाटील, प्रा. एस. डी. बोरसे, प्रा. के. पी. पाटील, प्रा. डी. एस. हिरे, प्रा. एस. जे. पाटील, प्रा आर. व्ही. धनगर, प्रा. जी. पी. महाले, प्रा .टी. ए. मोरे, आर. ए. पाटील, प्रवीण मनोरे, के. जी. पाटील, योगेश सिंहले, वसीम बागवान यांनी परिश्रम घेतले. परेश पाटील व ओझर ता. पाचोरा येथील याञा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती.




